महिला, मधुमेह, हार्टचे पेशंट, श्वसन विकारग्रस्तांना शासकिय कार्यालयात बोलावू नका सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व प्रशासनाला आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी मधुमेह, हार्टचे पेशंट आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये बोलाविण्याऐवजी त्यांना घरूनच काम करण्याचे आदेश द्यावेत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या प्रशासनाला दिली.
याबरोबरच महिला या कुटुंबातील प्रमुख असतात त्यामुळे या महिलांनाही कार्यालयात येण्यासंदर्भात आवश्यक करू नये असे आदेशही विभागाने बजाविले असून त्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी सूचनाही करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मधुमेह, हार्ट पेशंट आणि श्वसनाचे विकार असणाऱ्यांना या आजारापासून जास्त धोका आहे. यापार्श्वभूमीवर अशा व्यक्तींचे या कोरोनापासून बचाव व्हावा यादृष्टीकोनातून या आजाराच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावण्याऐवजी त्यांना घरातूनच काम करण्यास सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर प्रत्यक्ष बैठका घेण्याचे टाळावे आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठका घ्याव्यात अशा सूचना करत या बैठका घेताना झुम या अॅप्लीकेशनचा वापर टाळण्यासही सांगितले आहे.
त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जिल्हा परिषदा, पंचायती समित्या, महानगरपालिका, नगरपालिकांचे कर्मचारी यांच्या बैठका होतात. मात्र आता अशा बैठकांही रोखण्यात यावेत असे आदेश त्या त्या विभागाच्या बैठका त्यांच्याच कार्यालयात शाररीक अंतर पाळून घ्याव्यात अशी सूचनाही विभागाने केली आहे.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *