अखेर दोन दलित सनदी अधिकाऱ्यांनी केला राजकारणात प्रवेश सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, किशोर गजभियेंचा यांचे काँग्रेसमध्ये स्वागत

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून आणि कार्पोरेट क्षेत्रातील भल्यामोठ्या पगारींच्या आकड्यांना भुलत सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देत कार्पोरेट क्षेत्रात उडी मारणाऱ्या सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि निवृत्त अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने एका प्रसिध्द पत्रकान्वये सांगितले.

महाराष्ट्राच्या सत्तेस्थानी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात उभारलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवरील वादग्रस्त आदर्श इमारतीला बेस्ट डेपोच्या जमिनीचा एफएसआय दिल्याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमातून टीका झाली होती. तसेच त्यांची बेस्टच्या व्यवस्थापकिय संचालक पदाची कारकिर्दही वादग्रस्त ठरली होती. तसेच त्यांच्या तेथील कारभार पध्दतीवरून मोठ्या प्रमाणावर टीकाही झालेली.

तर सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी तर राज्यातील काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून आणि प्रशासनात आता काम करण्यासारखे उरले नसल्याचे खाजगीत बोलत सनदी अधिकारी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कार्पोरेट कंपनी असलेल्या मात्र गुढता कायम राखणाऱ्या इंडिया बुल्स या कंपनीत चांगल्या पदावर रूजू झाले असून ते अद्याप तिथे कार्यरत आहेत.

खोब्रागडे यांनी निवृत्तीनंतर तर गजभिये यांनी राजीनाम्यानंतर आपल्या दलित पणाचे कार्ड वापरून राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दलित समाजानेच नाकारल्याने त्यांचे राजकिय मनसुभे धुळीस मिळाले. अखेर रिपब्लिकन राजकारणात जागा निर्माण करणे अशक्य झाल्याने पुन्हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकिय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. त्यांच्या या प्रयत्नाला कितपत यश मिळेल ते आगामी काळच सांगेल.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *