Breaking News

देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली, राजीनामा स्विकारा पक्षात काम करण्याची पूर्ण मोकळी द्यावी केंद्रातल्या नेत्यांना भेटून सांगणार

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी नुकतीच झाली. या निकालात महाराष्ट्रातील लोकसभेच्या २३ जागांवर असलेली भाजपा अवघ्या ९ जागांवर आली. या पार्श्वभूमीवर या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी स्विकारत राजीनामा स्विकारण्याबाबात केंद्रीय नेतृत्वाला सांगणार असल्याचे सांगत पूर्ण वेळ पक्षाचे काम करण्यासाठीची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली.
तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना पक्षासाठी काम करता यावे यासाठी ते पक्ष नेतृत्वाला मंत्रिपदावरून मुक्त करण्याची विनंती करणार आहेत, असेही सांगितले.

प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वरिल वक्तव्य केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेते उपस्थइत होते.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी फक्त १७ जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीला मिळवता आल्या. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी कोण स्विकारणार याबाबत राजकिय वर्तुळातून व्यक्त करण्यात येऊ लागल्या. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी निकालाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पक्षाचे नेतृत्व करत असताना महाराष्ट्रातील निकालांची जबाबदारी मी घेतो, मी भाजपाच्या उच्च कमांडला माझ्या सरकारी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करत आहे जेणेकरून मी आगामी निवडणुकीत पक्षासाठी कठोर परिश्रम करू शकेन.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम महाराष्ट्रात २३ जागा मिळवल्या. त्यावेळी मात्र त्यांच्या कामगिरीला काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या विरोधी आघाडीच्या महाविकास आघाडीने (MVA) ग्रहण लावले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दिल्लीतील हाय कंमाडला मी लवकरच भेटून तशी विनंती करणार आहे. त्यानंतर पक्षाचे नेते जे सांगतील त्यानुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

महाविकास आघाडाने एमव्हीएने एकत्रितपणे ३० जागा जिंकल्या, ज्यामुळे युतीसाठी महत्त्वपूर्ण फायदा दिसून येतो. २०१९ मध्ये काँग्रेसला फक्त एक लोकसभेची जागा मिळाली होती. त्या तुलनेत काँग्रेसला १३ जागा जिंकल्या असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष बनला आहे. शिवसेना उबाठा गटाने (UBT) नऊ जागा जिंकल्या, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार य़ांच्या पक्षाने आठ जागा मिळवल्या.

https://x.com/Devendra_Office/status/1798288416733552906

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *