देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात आरोपी अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देना मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यांवर एका महिलेने आरोप करत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणी महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप करत आरोपी महिला, तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचे सांगत आमदार रोहित पवार आणि माजी सनदी अधिकारी मी आरोप करणार नाही पण प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात होते असा आरोप विधानसभेत केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणी विधानसभेत निवेदन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याला आयुष्यातून उठविण्याच्या हेतूनं राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. गोरेसंदर्भातील केस २०१६ मध्ये नोंद झाली आणि २०१९ ला संपली. तेव्हा ते सत्ता पक्षातही नव्हते. पण अचानक हे उकरून काढण्याचा प्रयत्न झाल्याचेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादी व्यक्ती अशा स्थितीत गोष्टी मिटविण्याचा प्रयत्न करते. पण त्यांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रार केली. त्यानंतर सापळा रचला, सगळं संभाषण रेकॉर्ड झालं. संभाषणाच्या अनेक क्लिप आहेत. पोलिस विभागाची खात्री पटल्यानंतर त्यांनी सापळा रचला, प्रत्यक्ष रोख रक्कम घेताना आरोपीला पकडण्यात आलं. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात एक नेक्सस काम करत होते. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक झाली आहे. एक स्वतः ती महिला आहे. दुसरा हा पत्रकार तुषार खरात आहे. आणि तिसरा अनिल सुभेदार नावाचा व्यक्ती आहे, या सगळ्यांनी मिळून कट रचला होता,याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांच व्हाट्सअप संभाषण सापडलं आहे. यांचे १५० फोन सापडले आहेत. यांनी कट कसा रचला, हे समोर आलं आहे. पण दुर्देवाची गोष्ट म्हणजे, यात सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात होते ते  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोक दिसतात असा आरोपही यावेळी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रभाकर देशमुख यात थेट १०० वेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. व्हिडिओ त्यांच्याकडे गेले. त्यांचही उत्तर आलं आहे. पण मला त्यापेक्षाही वाईट वाटतं की, ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना झाले आहेत याचं, जयकुमार गोरेंचे जे व्हिडिओ झालेत, ते आरोपींनी या दोघांना पाठवले आहेत. आता याची चौकशी झाली पाहिजे, पण हे चाललय काय आपण राजकिय शत्रू नाही आहोत, आपण राजकिय विरोधक आहोत अशा प्रकारे एखाद्याला राजकीय आयुष्यातून उठविण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकिचं आहे असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *