Breaking News

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात जाणार

पुणे येथील कल्याणीनगर येथील पोर्शे कारने वेदांत अग्रवाल याने रॅश ड्रायव्हींग करत दोघांचा निष्पाप बंळी घेतला. मात्र वेदांत अगरवाल हा अल्पवयीन असल्याचे पुरावे बाल हक्क न्यायालयात सादर केले. त्यामुळे कदाचित बाल हक्क न्यायालयास पोर्शे अपघाताची तीव्रता नजरेस आली नसावी म्हणून वेदांतला किरकोळ स्वरूपाची दिली. मात्र बाल हक्क न्यायालयाच्या निकाला विरोधात आम्ही वरच्या न्यायालयात जाणार असून वेदांत अगरवाल यांच्यावर अडल्टरी खाली कलम ३०४ अन्वया खाली खटला चालवावा अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

१३ लोकसभा मतदारसंघात मतदान होण्याच्या आदल्या दिवशी अर्थात १९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात वेदांत अगरवाल याने पोर्शे या महागड्या गाडीने रॅश ड्रायव्हिंग करत दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कपलचे निधन झाले. मात्र पुणे पोलिसांनी वेदांत अग्रवाल यांच्यावर लावण्यात आलेली कलमे फारच किरकोळ स्वरूपाची लावली. त्यामुळे १४ तासाच्या आत वेदांत अगरवाल यास बाल हक्क न्यायालयाने जामिन देत हा गुन्हा फारसा गंभीर स्वरूपाचा नसल्याची टीपण्णी करत ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, रोज वाहतूक अर्थात ट्रॅफिक पोलिसांबरोबर ट्रॅफिकची पाहणी करणे, वाहतूकीची नियम पाळणारी पेटींग काढणे आदी सारख्या किरकोळ शिक्षा सुनावण्यात आल्या. बालहक्क न्यायालयाच्या या शिक्षेवरून जनसामान्यात चांगलीच संतापाची लाट उसळली. त्याचबरोबर या प्रकरणात लावलेल्या कलमांवरून पुणे पोलिस आयुक्तांनीही तिरकस टीपण्णी केली. त्यामुळे अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन या प्रकरणाची सखोल माहिती घेतली.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, वेदांत अगरवाल यांच्या संदर्भात जे काही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले आहे किंवा येत आहे त्या आधारावर त्याच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पोर्शे या गाडीची नंबर प्लेटविना अर्थात पासिंग झालेली नसताना रॅश ड्रायव्हिंग करणे, त्यात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे आदींच्या अनुषंगानेही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वेदांत अगरवाल याचे वडील विशाल अगरवाल याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वेदांत अगरवाल बारमध्ये बसला होता त्या बारचे लायसन्स तपासणीचे आदेश दिले असून ज्या रेसिडेन्शल भागात असे बार असतील त्यांना परवानगी दिली जाणार नसल्याचे यावेळी सांगितले.

शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेदांत अगरवाल याला पकडण्यात आल्यानंतर पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे यात जे कोणी दोशी असतील त्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि संबधित व्यक्तींवरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *