चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

दरम्यान हे आंदोलन करण्यापूर्वी धनंजय देशमुख आणि काही गावकऱ्यांकडून त्या भागातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच मोबाईल टॉवरच्या परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यामुळे धनंजय देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांना मोबाईल टॉवर वर जाण्यापासून रोखले गेले. परंतु धनंजय देशमुख यांनी ऐनवेळी मोबाईल टॉवरऐवजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले.

तसेच पोलिसांनी आंदोलन थांबविण्यासाठी पाण्याच्या टाकीवर येवू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात लावलेली शिडीही काढून टाकली. त्यामुळे पोलिसांना पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन थांबविता आले नाही.

धनंजय देशमुख यांने आंदोलन मागे घ्यावे यासाठी बीडचे पोलिस अधिक्षक डॉ कामथ यांनीही धनंजय देशमुख यांसा मोबाईलवरून संपर्क करत पोलिस तपासाची माहिती देऊ असे आश्वासन देत आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले.

त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय देशमुख यांना आंदोलन स्थगित करावे असे आवाहन केले. तसेच तुझ्या केसाला जरी धक्का लागला तरी यांना नीट जगू देईन असा इशाराही यावेळी दिला.

यावेळी डिवायएसपी तिडके यांनीही धनंजय देशमुख यांना आंदोलन रोखण्यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धनंजय देशमुख म्हणाले की, मच्छिंद्र चाटे यांच्याशी मी १२ वाजता मच्छिद्र चाटे यांच्याशी बोललो, त्याचे रेकॉर्डिंग आहे, त्याची चौकशी का केली नाही, वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का कायदा का लावला नाही असा सवाल पाण्याच्या टाकीवरूनच विचारायला सुरुवात केली. त्यावेळी डिवायएसपी तिडके म्हणाल्या की, गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्याची माहिती तिडके यांनी धनंजय देशमुख यांना देत त्यांना आंदोलनापासून माघार घ्यायला लावण्याचा प्रयत्न केला.

परंतु अखेर मनोज जरांगे पाटील आणि पोलिस अधिक्षक कामथ यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरील आंदोलन स्थगित केले.

आंदोलन स्थगित केल्यानंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीखाली उतरले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आंदोलन स्थगित केले. नाहीतर आज मी एकटाच अगांवर पेट्रोल टाकून आत्मदहन केले असते. मात्र उद्या सकाळी १० वाजपर्यंत जर ग्रामस्थांच्या आणि माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या ब्रमदेव जरी आला तरी आत्मदहन केल्याशिवाय थांबणार नाही असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *