Breaking News

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती, NEET-PG परिक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात एनटीएने परिक्षेच्या तारखा जाहिर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

नीट पीजी NEET-PG परिक्षेचे नवीन वेळापत्रक पुढील दोन दिवसांत राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) जाहीर करेल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज २९ जून रोजी सांगितले. स्पर्धात्मक चाचण्यांतील कथित अनियमिततेच्या कारणास्तव NEET-PG ही परीक्षा मागील आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या परीक्षांपैकी एक आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाणा भाजपाच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पंचकुलामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेची तारीख, पदव्युत्तर पदवी NBE एक किंवा दोन दिवसांत जाहीर करेल, असे स्पष्ट केले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने रद्द केलेल्या तीन परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी वरील माहिती दिली.

विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) जी परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाला मिळाल्यानंतर १८ जून रोजी घेण्यात आल्याच्या एका दिवसानंतर रद्द करण्यात आली होती, ती आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.

NEET-PG पेपर लिकप्रश्नी धर्मेद्र प्रधान म्हणाले की, प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाली होती आणि टेलिग्राम ॲपवर प्रसारित झाली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे.

UGC-NET ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी परीक्षा आहे.

पूर्वीच्या पॅटर्नमधून बदल करून, परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीने आणि एकाच दिवशी घेण्यात आली. तथापि, पुनर्नियोजित परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) च्या पूर्वीच्या पॅटर्ननुसार पंधरवड्यामध्ये आयोजित केली जाणार आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) UGC-NET, जी परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या कथित अनियमिततेच्या कारणास्तव एक खबरदारीचा उपाय म्हणून पुढे ढकलण्यात आली होती, आता २५ जुलै ते २७ जुलै दरम्यान होणार आहे.

CSIR UGC-NET हे रसायन विज्ञान, पृथ्वी, वायुमंडलीय, महासागर आणि ग्रह विज्ञान, जीवन विज्ञान, गणिती विज्ञान आणि भौतिक विज्ञानातील पीएचडी प्रवेशांसाठी स्वीकारले जाते.

चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (ITEP) प्रवेशासाठी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (NCET), जी १२ जून रोजी सुरू होण्याच्या काही तास आधी पुढे ढकलण्यात आली होती, ती आता १० जुलै रोजी घेतली जाईल.

आयआयटी, एनआयटी, आरआयई आणि सरकारी महाविद्यालयांसह निवडक केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे किंवा संस्थांसाठी ही चाचणी घेतली जाते.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG आणि PhD प्रवेश NET मधील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने गेल्या आठवड्यात NTA मार्फत परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी एका पॅनेलला अधिसूचित केले होते.

Check Also

शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका

खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *