डॉ श्रीकांत शिंदे यांचे थेट आव्हान, खुमखुमी असेल तर लोकसभेत आमच्यासमोर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेनंतर दिले आव्हान

“जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्यासमोर येऊन निवडणूक लढवावी.” असे थेट आव्हान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना दिले.

गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर अंबरनाथमध्ये माध्यमांशी बोलताना डॉ श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांचा चांगला समाचार घेतला.

भाजपा नेते गणेश नाईक यांच्या टीकेला खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हाला माजी करण्याची भाषा करू नका; जनतेने तुम्हाला अनेकदा माजी केलं आहे,” असे म्हणत त्यांनी नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केला.

डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले, गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. राजकारणात टीका करावी, पण वास्तव विसरून बोलू नये.

शेवटी डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले की, गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा वापरू नये. “नागरिकांनी त्यांना अनेक वेळा माजी केलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *