मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत असताना, या भ्याड हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देत हौतात्म्य पत्करलेल्या मुंबई पोलीस दलातील शूर अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीर जवानांच्या स्मृतींना आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिवादन केले.
पोलीस आयुक्त कार्यालयातील शहीद स्मृती स्मारकाला सुनेत्रा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर शहीदांना मानवंदना दिली.
कर्तव्य बजावताना देशासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरांचे शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या त्यागाचे स्मरण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शहीदांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले.
Marathi e-Batmya