केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, महाराष्ट्रात २० नोव्हे. ला तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान, झारखंडमध्ये मात्र दोन टप्प्यात निवडणूका

दसऱा सणाच्या उत्सवानंतर महाराष्ट्रात केव्हांही विधानसभेची निवडणूक जाहिर होणार असल्याची शक्यता मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थाने सातत्याने केली होती. त्यानुसार आज दसरा सणानंतर आज मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांसह विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणूकांच्या तारखाही आज जाहिर केल्या. महाराष्ट्रात २० नोंव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी आणि निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहिर केली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले की, लेव्हल प्लेईंग फिल्डची समान संधी सर्व राजकिय पक्षांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत आजपासून महाराष्ट्रात आचार संहिता लागू होणार आहे. निवडणूकीची अधिसूचना २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी जाहिर करण्यात येणार आहे. २९ ऑक्टोंबर २०२९ उमेदवारी र्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर उमेदवारी अर्जाची छाननी ३० ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ रोजीची आहे. तर मतदान २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकचा टप्प्यात घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी आणि निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहिर कऱण्यात येणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी राज्याची नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्याच्या मतमोजणीची प्रक्रिया २३ नोव्हेंबर रोजीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आधीची विधानसभा संपुष्टात येण्यापूर्वीच नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे.

तर झारखंड राज्याची विधानसभेची मुदत ५ जानेवारी रोजी संपणार आहे. तत्पूर्वी झारखंडची नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्याचे झारंखड विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना १८ ऑक्टोंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २२ ऑक्टोंबर रोजी जाहिर करण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख पहिल्या टप्प्यासाठी २५ ऑक्टोंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २९ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. उमेदवारी अर्जाची छाणणी २८ ऑक्टोंबर आणि ३० ऑक्टोंबर अशी पहिल्या दोन टप्प्यासाठी जाहिर कऱण्यात आली आहे.

तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३० ऑक्टोंबर पहिल्या टप्प्यासाठी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १ नोव्हेंबर २०२४ ही तारीख जाहिर कऱण्यात आली आहे. तर झारखंडमध्ये १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याची एकाच दिवशी करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोंबर आधी नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आय़ुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *