टीम जुनीच पण अजित पवार यांची खुर्ची…एकनाथ शिंदे यांचा टोला, तर अजित पवार म्हणाले…. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत संवाद

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील मिश्किल टीपण्णीचीच जास्त भाव खाऊन गेल्याचे दिसून आले.

या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारची नवी टर्म असली तरी टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांमध्ये (मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून) खुर्चीची अदालाबदल झालेली आहे. पण अजित पवार यांची खुर्ची फिक्स आहे अशी मिश्किल पण उपरोधिक टोला यावेळी लगावला.

त्यावर अजित पवार यांनीही हजरजबाबीपणे एकनाथ शिंदे यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देत म्हणाले, तुम्हाला (एकनाथ शिंदे यांना उद्देशून) खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू असं म्हणत एकनाथ शिंदे यांचीच फिरकी घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या या मिश्कील टीपण्णीवर पत्रकार परिषदेत एकच हशा उसळला. त्यावर या हास्य विनोदात मुख्यमंत्री फडणवीसही सहभागी होत ही आमची रोटेटींग चेअर असल्याचे सांगत मिश्किल टीपण्णी केली,

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *