माविमच्या ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’च्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महिलांना स्थानिक जागी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहा येथे नवतेजस्विनी गारमेंट युनीटचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होण्यास सहाय लाभणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नवउद्योगात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

रोहा (रा.) येथे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) निर्मित ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या युनिटचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, माविम अधिकारी, पंचायत समिती सदस्य, उमेद व नगरपरिषद प्रतिनिधी, महिला बचत गटातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या उपक्रमामुळे रोहा तालुक्यातील महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू झाला आहे. महिलांचे प्रशिक्षण, स्थानिक भागातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार असल्याने आता महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचा आनंद आहे.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *