माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप, भाजपामुळेच अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्कांऊटर प्रकरणी अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

बदलापूर येथील दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची निगडीत संस्थेचा अध्यक्ष आपटे याच्या आदर्श शाळेतील शिपाई याला अक्षय शिंदे यास पोलिसांनी अटक केली. मात्र आपटे याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु अक्षय शिंदे याला उशीराने का होईना अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु न्यायालयातून त्याला ठाणे येथील तुरुंगात नेत असतानाच मुंब्रा बायपास रस्तावर त्यांच्या सोबत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर करण्यात आला.

या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य करताना भाजपाच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप केला.

दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महादंडाधिकाऱ्या मार्फत अक्षय शिंदे यांच्या एन्कांऊटरचा तपास अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यात अक्षय शिंदे यांच्या एन्कांऊटर प्रकरणी चार पोलिसांना दोषी धरण्यात आले आहे.

अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, आधीच सांगितल्या प्रमाणे अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडली नाही. तर पोलिसांनी अक्षय शिंदे याला ठार मारले. ज्या शाळेत लैंगिक अत्याचार झाले ती भाजपाच्या संबधित मंडळींची होती. भाजपाशी संबधित मंडळींना वाचविण्यासाठीच अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर करायला लावले काय असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, अक्षय शिंदे यांच्या अटकेनंतर पोलिस वाहनातून घेऊन जाताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतः गोळी झाडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पहिल्यांदा सांगण्यात आले. त्याचवेळी आपण संशय व्यक्त केला होता. पोलिसांजवळील बंदूक कोणी हिसकावून घेऊन गोळ्या झाडू शकत नाही. कारण पोलिसांजवळील बंदूक लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. महादंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे दिसून येत असल्याचेही यावेळी सांगितले.

अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, अक्षय शिंदे याने ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत होते. त्या पिस्तुलावर अक्षय शिंदे यांच्या बोटाचे ठसे नव्हते. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. ही बनावट चकमक कोणी केली, कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणली कोणाला वाचविण्यासाठी घडवून आणली असा सवालही यावेळी केला.

About Editor

Check Also

दुबईत अडकलेल्यांना मराठी जनांना विशेष विमानाने मुंबईत परत आणणार दुबईत अडकलेल्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *