Breaking News

शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी कंत्राटदार-स्ट्रक्चरल सल्लागारांच्या विरोधात गुन्हा दाखल सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केला गुन्हा

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि स्ट्रॅक्चरल सल्लागाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केल्यानंतर आठ महिन्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट २०२४) कोसळला.

बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तक्रारीनंतर, स्ट्रक्चरमध्ये गंजलेले नट आणि बोल्ट सापडले असून, कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांतर्गत मिलीभगत, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी कंत्राटदार जयदिप आपटे आणि स्ट्रॅक्चरल सल्लागार डॉ चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय दंडसंहिता कायद्यातंर्गत कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३ (५), ३ या विविध कलमाखाली गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. हा पुतळा नौदल डॉकयार्ड येथून निविदा काढून पुतळ्याचे काम देण्यात आले होते.

दरम्यान जयदीप आपटे हे ठाणे शहरातील रहिवाशी असून त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र तथा कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याशी जवळचे संबध असल्याची चर्चा असून या संबधातूनच शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट देण्यात आल्याची चर्चाही राजकिय वर्तुळात सुरु आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केलेली एफआयएची प्रत

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *