काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या त्या मागणीवर पंतप्रधान मोदी काहीसे गोंधळले लोकसभेतील गटनेते अधिरंजन चौधरी यांनी दिली माहिती

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. या सगळ्या घडामोडीत नुकताच दोन मुलींची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. तसेच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच मागणी केली. मात्र सोनिया गांधी यांच्या अनपेक्षित मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गडबडून गोंधळून जात ठिक है, देखता हूँ असे उत्तर दिल्याची माहिती लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधिररंजन चौधरी यांनी सांगितले.
ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिरंजन चौधरी म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथेप्रमाणे सर्वपक्षिय नेत्यांना नमस्कार करत अधिवेशनात होणाऱ्या चर्चेच्या अनुषंगाने बोलत भेटी घेत होते. त्यावेळी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना नमस्कार करण्यासाठी समोर आले. त्यावेळी सोनिया गांधी यांनी झटकन मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत याप्रश्नावर चर्चा संसदेत घडवून आणा अशी मागणी केली.

तसेच पुढे बोलताना अधिरंजन चौधरी यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्या या अनपेक्षित मागणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीसे गोंधळले. आणि उत्तर देत म्हणाले, ठिक है, देखता हूँ , असेही म्हणाले.

यावेळी अधिरंजन चौधरी म्हणाले की, आम्ही बऱ्याचवेळा सभापती यांच्या मार्फत एखाद्या विषयावर चर्चेची मागणी करतो. पण यावेळी पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधत चर्चेची मागणी केल्याचेही स्पष्ट केले.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *