विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहिर केल्यानंतर मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची आचारसंहिता जाहिर केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भूमिका जाहिर केली. त्यास काही अवधी लोटत नाही तोच ओबीसी नेते गणेश हाके यांनीही विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भूमिका जाहिर केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने भूमिका जाहिर केल्यानंतर ओबीसी नेते गणेश हाके यांनीही आपली भूमिका जाहीर केली आहे. गणेश हाके पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे, आम्हाला आमचं आरक्षण टीकवायचं असल्याने मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेणार आहोत. मनोज जरांगे पाटील ज्याच्या बाजूने भूमिका घेईल, त्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेणार आहोत. कारण आम्हाला आणचं आरक्षण टीकवायचं असल्याचंही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की, मराठा आरक्षणाला पुढे करून तो ज्या मराठा किंवा ओबीसी उमेदवारांच्या विरोधात भूमिका जाहिर करेल. नेमके त्याच्या विरोधात आम्ही आमची भूमिका जाहिर करू तसेच त्या त्या मतदारसंघातील ओबीसी मतदारांना त्या उमेदवाराच्या किंवा पक्षाच्या बाजूनं मतदान करायला सांगू असे सांगत शेवटी आम्हाला आमचं आरक्षण टीकवायचं आहे. तसेच आमच्या ओबीसी आरक्षण प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचेही यावेळी सांगितले.
गणेश हाके पुढे बोलताना म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आमच्या ओबीसीतून आरक्षण नको, आम्हाला आरक्षण टीकवायचे आहे. त्यामुळे तो ज्या उमेदवाराच्या, राजकीय पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल नेमकी त्याच्या विरोधात आम्हाला भूमिका ही घ्वाही लागणार असल्याचंही यावेळी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षण समर्थक गणेश हाके यांनी घेतलेल्या या दोन्ही भूमिकांमुळे आगामी विधानसभा निवडणूकीत राजकिय पक्षाच्या उमेदवारांच्या सामन्यापेक्षा मराठा विरूद्ध ओबीसी आणि ओबीसी विरूद्ध मराठा असा वेगळाच सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे या संघर्षाचा फायदा नेमका कोणाला होणार हे सांगणे जरी कठीण असले तरी दोन जातींमधील संघर्ष मात्र राज्यातील जनतेला पाह्यला मिळणार असे दिसून येत असल्याचे दिसून येत आहे.
Marathi e-Batmya