नुकतेच राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या पात्रतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक लाभार्थी महिलेने तीचे आधार कार्ड बँक खात्याशी संगलग्नित करावे असे सांगितले होते. तर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नियमानुसार एकाच योजनेच्या लाभ महिलांना घेता येईल असे जाहिर वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून लाडकी बहिण योजनेतील महिलांकडून दिलेले पैसे परत घेणार असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल कल्याण विभागाने यासंदर्भात एक एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
आता महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी लाडकी बहिण योजनेतंर्गत आतापर्यंत लाभ घेतलेल्या महिलांना अपात्र ठरविण्यासाठी अटी घातल्यानंतर आता या अटीमुंळे अपात्र ठरणाऱ्या महिलांना आता पर्यंत मिळविलेले पैसे परत मागणार असल्याची चर्चा सुरु झाली असताना पैसे परत आणि पुढे अपात्र ठरणाऱ्या महिलांनी पैसे परत करण्याची सक्ती नाही असे जाहिर केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.
या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव यादव यांनी केले आहे.
Marathi e-Batmya