शासकीय संकेतस्थळांवरील मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिका-यांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना अद्यापही शासकीय संकेतस्थळांवरती मुख्यमंत्री आणि शासनाच्या जाहिराती दिसत आहेत.
https://cmo.maharashtra.gov.in/ , https://maharashtra.mygov.in या शासकीय संकेतस्थळावर अद्याप मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती झळकत आहेत. हा सरळसरळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे. या जाहिराती तात्काळ बंद करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली.

 

 

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *