राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वाधिक ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही- जयंत पाटील

मुंबईः प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
१३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस – १९३८, भाजप – २९४२,शिवसेना – २४०६ यांनी एवढया ग्रामपंचायती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील पक्ष असल्याचे आज सिद्ध झाले आहे. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे पक्ष पुढे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा दावा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *