दादरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांची माहिती

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये आता शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना भवनच्या धर्तीवर प्रति सेना भवन उभारण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मुळ शिवसेना भवनला हा प्रती सेना भवनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. त्यावेळी सदा सरवणकर म्हणाले की, हे प्रतिसेना भवन नसून मुंबईतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार आहे.

दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईच्या प्रत्येक प्रभागामध्ये या प्रतिसेना भवनाचे कार्यालय असेल. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्धाटन करण्यात येणार असून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला पोहचला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेले शिवसेना भवन दादरमध्येच आहे. अशातच शिंदे गटाकडून दादरमध्येच प्रती सेनाभवन उभारण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, शिंदे गटाच्या या मुख्य कार्यालयाचे नाव काय असेल याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

आम्ही अद्याप शिवसेनेतूनच आहोत. शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे सरवणकर म्हणाले. तसेच मुंबईतील प्रत्येक प्रभागात अशा प्रकारची कार्यालय उभारण्यात येणार असून दादरमध्ये उभारण्यात येणारे कार्यालय मुख्य असल्याचेही सरवणकर म्हणाले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *