अरविंद सावंत यांचा सवाल, आता यांना पान्हा फुटला, मृतदेह देताना कुठे गेला होता? देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित केल्याचं समोर आलं होते. त्यावरून भाजपाचे नेते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. त्याला आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकूबची शवयात्रा काढून का दिली, असा सवाल अरविंद सावंत यांनी भाजपाला विचारला आहे.

अखिल वारकरी संघ राष्ट्रीय कीर्तनकार यांची शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, याकूब मेमनच्या कबर आणि त्याच्यावरील सुशोभीकरणाबद्दल यांना पान्हा फुटला आहे. याकूबचा मृतदेह देण्यात आला होता, तेव्हा कुठे गेला होता. भाजपा आता भेकडांचा पक्ष झाला आहे. भाजपाकडून मुळ मुद्दा सोडून दुसरीकडे विषय नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी भाजपावर केला.

२०१५ साली याकूबला फाशी दिली गेली, तेव्हा तुमचेचं तथाकथित हिंदुत्ववादी सरकार होते. ओसामा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दगड बांधून टाकला, तसे याकूबबाबत का केलं नाही? असा सवाल करत त्याची शवयात्रा मोठ्या प्रमाणात निघाली, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मग त्याचं उदात्तीकरण करायला का दिलं, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

भाजपा आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुहृदयसम्राट, असा उल्लेख केला. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, एवढं चांगलं देवाचं भागवत धर्माचं बोलतं आहे. तेव्हा अर्धमाचं बोलावं, अशी इच्छा नाही आहे असा टोमणाही त्यांनी नीतेश राणे यांना लगावला.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांची खैरात वाटणाऱ्यांना बडतर्फ करा शासकीय दुखवटा असतानाही प्रमाणपत्र वाटण्याची घाई कशासाठी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालेल्या दिवशीच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी शैक्षणिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *