जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, भाषण संपताच तो व्हॉट्स चॅट बाहेर आलाच कसा आव्हाडांची पोलिसात तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास २० दिवस झाले. तरीही पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झाली नाही. मात्र या निर्घुण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यातच या प्रणातील संशयित आरोपी म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड याचे नाव पुढे येत असून वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे यांचे संरक्षण असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर बीडमधील सर्वपक्षियांच्यावतीने संतोष देशमुख मारेकऱ्यांना अटक करावी आणि न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी ठाण्यातून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे ही गेले होते.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एका व्यक्तीशी व्हॉट्स अॅप चॅट केल्याचा स्क्रिन शॉट व्हायरल होत असून या स्क्रिन शॉटच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

जितेंद्र आव्हाड यांच्या या स्क्रिन शॉटच्या अनुशंगाने अजित पवार यांच्या पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड नेमके कशासाठी गेले होते, न्याय द्यायला की आग लावायला असा गंभीर आरोप करत तो स्क्रिनशॉट ट्विट्वर शेअर केला आहे.

या व्हॉट्स अॅप चॅटवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मोर्चातील भाषण संपल्यानंतर तो व्हॅट्सअॅप चॅटचा स्क्रिन शॉट कसा बाहेर आला असा सवाल करत मग सकाळी का तो बाहेर आला नाही असा प्रश्नही यावेळी केला.

यापार्श्वभूमीवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी शनिवारी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार केली आहे. आता फक्त बीडच्या पोलिसांना विनंती आहे की त्यांनी पुढील कारवाई करावी अशी मागणी करत माझं भाषण संपल्या संपल्याच तो स्क्रिनशॉट बाहेर कसा आला, सकाळी का नाही आला, भाषणानंतर अचानक कसा येतो अशी प्रश्नांची सरबतीही केली.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला कालपासून धमक्यांचे मेसेज येत आहेत. मला आताही एक मेसेज आला असून अतिशय अर्वाच्य आणि घाणेरडा शिवीगाळ करणारा तो मेसेज आहे. तसेच त्यात मला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. यावरून अजून मस्ती गेलेली नाही. हा मेसेज मी थेट पोलिसांना पाठविणार आहे. कुठेही यंत्रणेची भीती राहिलेली नाही. मग काय तर द्या धमकी, परंतु मी असा घाबरणारा आमदार नाही, मला शिव्या दिल्या तरी मी माझ्या मुद्यावरून बाजूला होणार नाही. ही लढाई माणूसकीची असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *