Breaking News

चंपाई सोरेन भाजपात? सोरेन म्हणाले, मी माझ्या कामानिमित्त दिल्लीत भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा

झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे पुन्हा हेमंत सोरेन यांच्या हाती सोपविल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.

हेमंत सोरेन यांना जामिन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चंपाई सोरेन यांनी पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन हे सातत्याने भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. आझ चंपाई सोरेन यांनी पश्चिम बंगालहून दिल्लीला विमानाने पोहोचले. यासंदर्भात चंपाई सोरेन यांना विचारले असता ते म्हणाले की, मी जिथे आहे तिथेच आहे. पण काही वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आलो आहे असे स्पष्टीकरणही दिले.

भाजपामध्ये सहभागी झाल्याच्या अफवांवर चंपाई सोरेन म्हणाले की, मी येथे माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो आहे. अभी हम जहाँ पर हैं वही पर हैं, तसेच आपल्या मुलीला भेटण्यासाठी मी दिल्लीत आल्याचेही सांगितले.

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे आज सकाळी दिल्लीला जात असताना अफवा पसरल्या की, त्यांच्यासोबत पक्षाचे सहा आमदार आहेत आणि ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

चंपाई सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला झारखंड मुक्ती मोर्चाच्या पक्षाकडून “निव्वळ अफवा” असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावले.

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी भाजपाला “बुडणारे जहाज” असल्याची टीका करत त्या पक्षात चंपाई सोरेन कधीही सहभागी होणार नसल्याचा दावा करत तसा त्यांचा विचारही नसल्याचे सांगत प्रसारमाध्यमांचा दावा फेटाळून लावला.

हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर सोरेन कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर चंपाई सोरेन यांनी ३ जुलै रोजी पदावरून पायउतार झाले.

यानंतर, हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी चंपाई सोरेन यांना सर्वोच्च पदावरून हटवण्यात आल्याने ते खूश नव्हते, अशी अटकळ पसरली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड मुक्ती मोर्चा चंपाई सोरेन यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या सहा आमदारांशी संपर्क करू शकला नाही.

सूत्रांनी सांगितले की, चंपाई सोरेन हे भाजपाच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत. काल रात्री ते कोलकाता येथे होते तेथे त्यांनी बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली.

शिवाय, सोरेन हे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सतत संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तथापि, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या ज्येष्ठ नेत्याने शनिवारी भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या अफवांचे खंडन केले.

“कोणत्या अफवा पसरवल्या जात आहेत हे मला माहीत नाही. कोणत्या बातम्या चालवल्या जात आहेत हे मला माहीत नाही, त्यामुळे ती खरी आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. मला याबद्दल काहीही माहिती नाही… हम जहाँ पर हैं वही पर हैं (मी फक्त येथे आहे), “चंपाई सोरेन यांनी शनिवारी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *