जेएनयु हल्याप्रकरणी राष्ट्रवादीची भाजप कार्यालयासमोर निदर्शने विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

मुंबईः प्रतिनिधी
जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भाजपाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शनिवारी रात्री जेएनयु (JNU) मधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले.
हा हल्ला पुर्वनियोजित होता हे लक्षात येत असून या कृत्याच्या निशेषार्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या युवकांनी जोरदार घोषणाबाजी आणि फलक दाखवत निषेध केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *