फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येईल किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही - जयंत पाटील

शिर्डी: प्रतिनिधी

किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे सत्यात कधी येणार असा सवाल करत याची माहिती आता माध्यमांनीच द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील केले.

शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले असता माध्यमांनी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. तसेच जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्याबरोबरच फडणवीस यांचीही जोरदार फिरकी घेतली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 बुथ कमिट्या तयार करा २०२४ मध्ये या दोन्ही मतदारसंघात चित्र वेगळे पाहायला मिळेल

बुथ कमिट्या तयार करा २०२४ मध्ये या दोन्ही मतदारसंघात चित्र वेगळे पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वात जास्त जनाधार लाभलेले नेतृत्व राष्ट्रवादीत असून शरद पवारांच्या रुपाने सर्वात अनुभवी नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही असे सांगतानाच जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा, फोन नाही उचलला तर मेसेज करा उत्तर नक्कीच मिळेल अशी ग्वाहीही त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके युवक तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, महिला तालुकाध्यक्षा अर्चना कोते, शिर्डी युवक शहराध्यक्ष विशाल भडांगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *