देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन, रामनमवीचा कार्यक्रम पार पाडावा तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कोणी करू नका

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरममध्ये दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही पाह्यला मिळाले. यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या राड्याप्रकरणी शिंदे गटाबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर आरोप केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, तसेच राजकिय रंग देणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत राम नवमीचा कार्यक्रम पार पाडावा असे आवाहन केले.

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्दैवी काहीही नाही, असेही म्हणाले.

तसेच सर्वांनी शांततेत रामनवमीचा कार्यक्रम पार पाडावा. कुठेही गडबड होऊ नये. तसेच शांततेचा भंग होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, तणाव निर्माण होईल, असं वर्तन कोणीही करू नये, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. किराडपुरा भागातील राममंदिराजवळ काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *