काँग्रेसची ४ थी ४६ लोकसभा उमेदवारांची यादी जाहिरः महाराष्ट्रातील चार उमेदवार

लोकसभा निवडणूकीतील पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेची सुरुवात झालेली असताना काँग्रेस आणि भाजपाकडून अद्याप उमेदवारांची यादी अंतिम करण्याचेच काम सुरु आहे. मागील वेळी काँग्रेसने जाहिर केलेल्या तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील फक्त ७ उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली होती. तर आज काँग्रेसने एकूण ४६ उमेदवारांची यादी जाहिर केली असून महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहिर केली आहेत.

काँग्रेसने आज रात्री उशीरा ४२ लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर करताना महाराष्ट्रातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी श्यामकुमार बर्वे, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉ प्रशांत यशवंतराव पडोळे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर गडचिरोली-चिमुर मतदारसंघातून डॉ नामदेव दासाराम किरसन यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर नागपूरमधून विकास ठाकरे यांचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी जाहिर करण्यात आले आहे.

याशिवाय मिझोरम, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम, जम्मू आणि काश्मीर, तामीळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील मिळून एकूण ४६ लोकसभा उमेदवारांची यादी काँग्रेसने प्रसिध्द केली आहे. दरम्यान वाराणसी येथून काँग्रेसचे अजय राय हे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. तशी घोषणाही यावेळी जाहिर करण्यात आली.

About Editor

Check Also

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *