Breaking News

लोकसभा निवडणूक २०२४ः एनडीए आणि इंडिया आघाडीबाबत एक्झिट पोल काय म्हणतो फक्त वाचा एक्झिट पोलची माहिती

देशातील ५४८ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीच्या आज सातव्या टप्प्याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पडली. केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी ५४८ पैकी २७२ चा जादूई आकाडा ज्या राजकिय पक्ष किंवा आघआडीला मिळेल त्या पक्षाची सत्ता केंद्रात स्थापन होणार आहे. दरम्यान देशातील विविध मतदानोत्तर लोकसभा निवडणूकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थांनी आपापले दावे आज जाहिर केले आहेत.

या सर्व्हेक्षणानुसार रिपब्लिक पीएमएआक्युने एनडीएला ३५९ इतक्या जागा जागा दाखविल्या आहेत. इंडिया आघाडीला, १५४ इतक्या कमी जागा दाखविल्या आहेत. तर इतरांना ३० जागा दाखविल्या आहेत.

याशिवाय इंडिया न्यूज-डि डायनामिक्स च्या एक्झिट पोल मध्येः भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३६२ ते ३९२ इतक्या जागा दाखविल्या आहेत. तर इंडिया आघाडीला १४१ ते १६१ आणि इतरांना १०-२० जागा दाखविल्या आहेत.

जन की बात ने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये- एनडीए आघाडीला ३५३ ते ३६८ इतक्या जागांचा अंदाज वर्तविला आहे. तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ इतक्या जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. तर इतरांना ४३ ते ४८ इतक्या जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.

आरबी मेटरिजने सादर केलेल्या एक्झिट पोल मध्ये- भाजपाच्या एनडीए आघाडीला ३७१ इतक्या जागांचा अंदाज वर्तविला आहे. तर इंडिया आघाडीला १२५ लोकसभेच्या जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर इतरांना ४७ जागा मिळणार असल्याचे भाकित केले आहे.

न्युज नेशनने सादर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला ३४२ ते ३७८ इतक्या जागा मिळणार असल्याचे भाकित केले आहे. तर इंडिया आघाडीला १५३ ते १६९ इतक्या लोकसभेच्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून इतरांना २१ ते २३ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दिव्य भास्करनेही आपल्या एक्झिट पोल मध्ये- भाजपाच्या एनडीएला २८१ ते ३५० इतक्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करत इंडिया आघाडीला १४५ ते २०१ इतक्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर इतरांना ३३ ते ३९ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

न्युज २४-चाणक्याने सादर केलेल्या एक्झिट पोल मध्ये- भाजपाच्या एनडीएला ४०० जागा दाखविल्या आहेत. तर इंडिया आघाडीला १०३ जागा मिळाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर इतरांना २९ जागा मिळतील असे भाकित केले आहे.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *