Breaking News

महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती लागली कामाला नेत्यांना टार्गेट करून वातावरण बदलण्याचा प्रयत्न

बदलापूर येथील दोन चिमुरडींवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गटाकडून करण्याचे प्रकरण ताजे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडण्याची घडली. या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे योग्यरितीने हाताळू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या हातात सत्ताधाऱ्यांनी आयतेच कोलीत दिले. आता पुन्हा एकदा महायुती सरकार महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधात ईडी व सीबीआयचा वापर करण्याच्या विचार असल्याची माहिती एका मंत्र्यांच्या सचिवाने दिली.

आधीच विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांची माफी मागितली खरी पण माफी मागताना सावरकर यांच्यावरील टीकेचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या टीकेमुळे महाविकास आघाडीचे सर्वच नेते सत्ताधारी महायुती सरकारवर तुटून पडले. इतके सगळं होऊनही राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील जनतेची माफी मागण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेचा ठपका नैसर्गिक हवामानावर ठेवला.

राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापवायला महाविकास आघाडीला आयतीच संधी मिळाली. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात आधीच निर्माण झालेला असंतोष आणखीनच वाढविण्यास महाविकास आघाडीला मदत झाली. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला कॉर्नर करण्यास विरोधक महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे आता महायुतीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक आमदारांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती पुढे येत असून डुबती नैय्या मै कोण सवारी करे असे सांगत सत्ताधारी पक्षातील आमदार पुन्हा स्वगृही परतण्याच्या मार्गावर असल्याचेही यावेली सांगितले.

दरम्यान, वाढत्या जनतेतील असंतोषाला वाफ देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुन्हा एकदा रोखण्यासाठी आणि भाजपाचा दबदबा-भीती पुन्हा निर्माण करण्यासाठी भाजपाकडून पुन्हा एकदा भाजपाच्या ईडी-सीबीआय छापाचा खेळ सुरु करण्याबाबतचा विचार गंभीरपणे सुरु आहे. तसेच आता वेळ पडली तर राज्यातील इतर पक्षांच्या आमदार आणि उमेदवार गायब करण्याची माहिती एका मंत्र्यांच्या सचिवाने दिली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *