Breaking News

महेश तपासे यांची मागणी, सुप्रिया सुळे फोन हॅकप्रकरणी गृहविभागाने खुलासा द्यावा गृहविभागानेच पाळत ठेवल्याचा आरोप

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल व व्हाट्सअप अकाउंट हॅक केल्यावरून चर्चांना उधाण आले, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप आरोप भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारवर केला. तसेच या पाळत प्रकरणी राज्याच्या गृहविभागाने खुलासा द्यावा अशी मागणी केली.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याकरिता भाजपाने सर्व प्रयत्न केले. आमचा पक्षही फोडला मात्र सुप्रिया सुळे यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळे त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. ही बाब भारतीय जनता पार्टीच्या पचनी पडली नाही व पक्ष फोडूनही काहीच फायदा झाला नाही असे मत भाजपा व संघाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचा टोलाही लगावला.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले की, आपल्या राजकीय विरोधकांवर पाळत ठेवण्याचे आरोप याआधी देखील भारतीय जनता पार्टीवर अनेक वेळा झाले. त्यातच मध्यंतरी पेगासीस स्पायवेअरचा उपयोग केला जातो अशाही शंकांना उभारी देणाऱे अनेक वृत्तही प्रसारमाध्यमातून प्रकाशित झाल्याची आठवणही यावेळी सांगितली.

फोन हॅकींग प्रकरणी भाजपावर टीका करताना महेश तपासे म्हणाले की, महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पेगासीस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या हालचालींवर विशेष करून सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाना पटोले यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत असण्याची शंका नाकारता येत नाही असा संशयही यावेळी व्यक्त केला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाने याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *