मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा, आता कासरा कसा ओढतो बघा… आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या नाही तर तुमचा खेळ संपवलाच म्हणून समजा

माझ्या समाजातील गोरगरीब-पोरांना अधिकारी झालेल बघायचाय, त्यामुळे या तरूण पोरांच भविष्य घडविण्यासाठी मी ही लढाई सुरु केलेली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय या लढाईतून माघार कधीच घेणार नाही असे जाहिर प्रतिपादन करत मला माझ्या समाजाकडून एकच वचन हवंय, कोणाला पटो अथवा नाय पटो पण मी सांगेल तेवढंच करायचं तुम्ही शब्द देणार का असे आवाहन सभेसाठी उपस्थित मराठा समाजाच्या जनसमुदायाला केले. त्यावेळी मराठा समाजाने होय होय असा प्रतिसाद देताच मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी सूचक इशारा देत म्हणाले आता बघा कासरा कसा ओढतो बघा असे आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले.

दसरा सणानिमित्त आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील समस्त मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर पहिल्यांदाच दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. या दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी वरील सूचक इशारा दिला.

या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्यावेळी मी सत्ताधाऱ्यांना आवाहन केलं होतं. पण सत्ताधाऱ्यांनी आपल्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता मराठा समाजाच्या गोर गरीब लोकांना हक्काचं पाहिजे असलेलं आरक्षण मिळवून द्यायचं आहे. त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी आमची मागणी मान्य करावी असे आवाहन करत जर आचारंहिता लागू होण्यापूर्वी आमची मागणी मान्य न केल्यास काय करेन ते दाखवतो असे सांगत इशाराही यावेळी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करत कुठे गेले ते नेते असा सवालही यावेळीही केला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला थेट आवाहन करत म्हणाले की, मला समाजाकडून एक वचन हवय, कोणाला पटू अथवा नको पटू पण मला समाजाकडून एक वचन हवयं असे सांगत समाजाला विचारणा केली. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाने पाटील पाटील अशी घोषणा देत होकार दिला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित समुदायाला म्हणाले की, आता इथून पुढे मी जे सांगेन तेवढंच करायचं त्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही, कोणाला पटो अथवा न पटो आता मी सांगेन त्या बर केलं पाहिजे. तरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असे सांगत तसं वचन देणार का असे आवाहन केले. त्यावर उपस्थित मराठा समाजाने होकार दिल्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले आता बघा कसा कासरा ओढतो त्यांच्या भोवती असे आव्हानच यावेळी सत्ताधारी आणि आरक्षण विरोधकांना दिला.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मी शब्द दिलेला आहे, राजकिय नावं घेऊन बोलणार नाही, कोणत्याही जातीवरून टीका करणार नाही. त्यानुसार मी कोणतीही टीका टीपण्णी इतरांवर करणार नाही. या गडाची एक परंपरा आहे. ती परंपरा मी जपत आलो आहे. तसेच मराठा समाज आणि गडाचा अवमान होणार नाही असे कोणतेही भाष्य करणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाची पोरं शिकली पाहिजे, ते अधिकारी झाली पाहिजे त्या गरिब सर्वसामान्य मराठा समाजासाठी हा लढा पुकारलेला असल्याचे सांगत आता या लढ्यातून माघार नाही, आरक्षण घेतल्यानंतरच माघार घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *