मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रेदशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुहास माटे, योगेश आवळे, गोविंद गायकवाड, विनोद पानगिळे, अजय गमरे आदी उपस्थित होते. वेतन सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल योगेश आवळे आणि विरेंद्र ठाकर यांचा रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  मनसे कामगार संघटनेच्या अनेक पदाधिका-यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देत पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे कायद्यात बदल करून कामगार हीत कसे साध्य करता येईल याचा विचार आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय वेतन कायदा तुम्हा सर्वांना लागू झाला आहे. त्यामुळे वर्षात दोन वेळा वेतनवाढ होणार आहे. सेवाक्षेत्रात कुठलीही कसूर न ठेवता उत्तम सेवा कशी देता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहनही केले.

सुहास माटे म्हणाले की, ९ जून रोजी  किमान वेतनासाठी रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने करार केला त्यानंतर पगारवाढ झाली. गेल्या काही  महिन्यांत कामगारांना त्यांचे हक्क देण्याचा भाजपाने प्रामाणिक प्रयत्न केला. भाजपा आणि रविंद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीवर विश्वास बसल्याने सर्व पदाधिका-यांनी आणि कामगारांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला  आहे.

मनसे कामगार सेनेच्या विमानतळ कामगार संघटनेचे निलेश कोळेकर, संजय गुणके, दत्ता भोसले, विवेकानंद कांबळे महेंद्र पांडे, रत्नाकर गांधी, राजेंद्र धुमाळ, वैभव कोकरे, विनोद कांबळे, लक्ष्मण चौगुले, प्रवीण पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, डॉ आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *