Breaking News

मराठा-ओबीसी कार्यकर्त्ये एकमेकांच्या आमने-सामनेः पुढील अनर्थ टळला वढगुद्री आणि अंतरावली सराटीतील कार्यकर्त्ये आले समोरासमोर

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथे आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. मात्र अंतरावली सराटी येथे जाण्यासाठी वढगुद्री येथूनच पुढे जावे लागते. नेमक्या वढगुद्री येथे ओबीसी समाजाचे गणेश हाके आणि प्रा. लक्ष्मण वाघमारे यांचेही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीवरून आंदोलन सुरु आहे. मात्र आज दुपारी मराठा समाजाचे कार्यकर्त्ये आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्त्ये अचानक समोरा-समोर आल्याने काही काळ येथील परिस्थिती तणावग्रस्त बनली. मात्र पोलिसांनी वेळीच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे पुढील संभाव्य परिस्थिती टळली.

आज दुपारी राज्याच्या इतर भागातून मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे आंदोलन सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बाईक रॅली काढत काही कार्यकर्त्ये अंतरावली सराटी येथे चालले होते. त्यावेळी या बाईक रॅलीवरून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनास बसलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यावरून तेथील इतर मराठा कार्यकर्त्यांनी ओबीसी कार्यकर्त्ये उपोषणास बसलेल्या ठिकाणाकडे घोषणा देत जाऊ लागले.
ते पाहुन ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनीही मराठा समाजाच्या दिशेने पुढे जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील वातावरण तंग बनले.

वढगुद्रीजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्याना सुरक्षित ठिकाणी थोपविण्याचे काम सुरु केले. त्यामुळे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याला विचारले असता तो कार्यकर्त्या म्हणाला की, मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी आधी बसले. त्यानंतर ते उपोषणास बसले. बरं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पाहुन ओबीसीच्या घोषणा देण्याची गरजच नव्हती. मात्र ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक दिल्याचा आरोप केला.

यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांच्या विरोधात ओबीसी समाजाला उपोषणाला बसवून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे दोन समाजात भांडण लावू पहात आहेत. निवडणूकीच्या तोंडावर ह्या असल्या गोष्टी करून दंगली घडविण्याचे कारस्थान असल्याचा आरोपही यावेळी केला.

तर ओबीसी नेते गणेश हाके म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगलाच दिसतो का असा सवाल करत त्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांचे बंगले दिसत नाहीत का असा सवाल करत त्यांच्या झुंडशाहीसमोर आम्ही झुकणार नाही. त्यांनी काहीही मागणी करावी आणि सरकारने त्यांच्यासमोर होकार भरावा हरे खपवून घेणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत