नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा, तर मी कायदेशीर कारवाई करणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी जोडल्यास कारवाई करणार

विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून मानखुर्द शिवाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. त्यातच आज पुन्हा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचा प्रचार भाजपा करणार नसून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहिर केले. त्याचबरोबर जरी नवाब मलिक निवडूण आले तरी त्यांना सरकारमध्ये सहभागी करणार नसल्याचेही जाहिर केले.

परंतु नवाब मलिक यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधाला प्रत्युत्तर देत उलट कायदेशीर कारवाईचा इशारा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांनी माझ्या प्रचारासाठी यावे असा काही माझा आग्रह नाही. तसेच मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या उमेदवारीबाबत कितीही विरोध केला तरी मला त्याचे देणेघेणे नाही.

तसेच नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की, काही जण मला बदनाम करण्यासाठी सातत्याने माझ्या नावासोबत दाऊदचे नाव जोडत आहेत. तसेच जे बोलायला नको पाहिजे होते ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलले आहेत. जर त्यांनी विधानसभा सभागृहात बोलण्याऐवजी बाहेर बोलले असते तर त्यांच्या विरोधात मी कायदेशीर कारवाई केली असती असे सांगत निवडणूकीत माझ्या नावा सोबत जो कोणी दाऊदच्या नावाचा वापर करून माझ्यावर टीका करेल त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी भाजपाच्या नेत्यांना दिला.

दरम्यान, नवाब मलिक यांनी कुर्ला येथील जमिन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहिण हसिना पारकर हिच्या माणसांकरवी खरेदी केली होती. तसेच त्या जागेचे पैसैही त्या व्यक्तीला दिले होते. मात्र त्या जागेची मालकीण असलेल्या महिलेने जागेच्या खरेदीचे पैसे आपणाला मिळाले नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नवाब मलिक यांचे दाऊदच्या माणसाशी संबध असल्याचा आरोप करत जागा खरेदी करण्यासाठी दिलेले पैसे दहशतवादी कारवायांसाठी एकप्रकारे पुरविल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर जी काही कारवाई झाली ती सर्वश्रुतच आहे. परंतु नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज डिलर असलेल्या काही व्यक्तींसोबत फोटो काढल्याचे दाखवून देत त्यांनी शूट केलेल्या एका व्हिडिओला वित्तीय पुरवठादारही त्या ड्रग्ज डिलरमधील एक जण असल्याचा आरोप केला होता.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *