गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोदी सरकारला खुले पत्र ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’; गॅस दरवाढीवर शरद पवार गटाचा सणसणीत टोला

गॅस दरवाढीनंतर देशभरात नाराजी पसरलेली असतानाच आता विरोधकांनी सुद्ध मोदी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने  जनतेसाठी मोदी सरकारकडून एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात मोदी सरकारच्या धोरणावर तिरकस टीका करण्यात आली. मोदी सरकारच्या धोरणाचा समाचार घेतानाच जनतेला आता ही दरवाढ सहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रात काय म्हटले आहे ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर हे पत्र शेअर केले आहे. गॅस दरवाढीवर मोदी सरकारचं खुलं पत्र, असं या पत्राचं शीर्षक आहे. या पत्रातील मजकूरानुसार, ” प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार.”

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *