Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘महायुतीचे काळे कारनामे’ पुस्तिकेचे अनावरण दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न खासदार डॉ. अमोल कोल्हे

राज्यातील महायुतीचं सरकार हे भेदरलेलं आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची मुंबईमध्ये आज पत्रकार परिषद पार पडली. ‘महायुतीचे काळे कारनामे’, असे नावं दिलेल्या पत्रकार परिषदेतून जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी केले. यावेळी राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी घटनांवर भाष्य करत जयंत पाटील यांनी सरकारवर पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कँपन लॉन्च करत आहोत. त्यात लोक त्यांची मतं मांडू शकतात. त्याचा जाहीरनामा बनवताना विचार केला जाईल. १९ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत हे कँपेन लागू राहिल. महायुतीचे काळे कारनामे नावानं पुस्तक बनवून महायुती विरोधात एल्गार करणार असल्याचं सांगत यावेळी काळे फुगे फोडून महायुती सरकारचा निषेधही करण्यात आला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये गेल्या ५ महिन्यांत तब्बल १०७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात एक नंबरवर पोहोचला आहे. तर गुन्हेगारीच्या बाबतीतही हे महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे. तसेच, एकीकडे महागाई वाढत चालली असताना शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत, हे डबल नाहीतर ट्रबल इंजिनच सरकार असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांचा एकच‌ नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा असे चित्र राज्यात आहे. राज्यात २५ नेते असे आहेत जे आरोप झाल्यानंतर भाजपामध्ये गेले अन् कारवाई बंद झाली. ताजे उदाहरण रविंद्र वायकर आहेत, म्हणजे तिकडं गेली की चौकशी काही होत नाही. आता खेडकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला तर त्या सुटू शकतात असं माझ्या वाचण्यात आलं असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. राज्यातून प्रकल्प गुजरातला गेले तरी मूग गिळून गप्प बसणारं महाराष्ट्रातील हे सरकार आहे. या सरकारच्या काळात पेपरफुटीचे घोटाळे प्रचंड वाढले. पाच वर्षात साडे ११ लाख विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला. नवे उद्योग आणता आले नसल्याचा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या सरकारने गुन्हेगारीतही महाराष्ट्राला एक नंबरवर नेऊन ठेवलं आहे. डेटानुसार महाराष्ट्र दंगली घडवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. मर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बलात्कारामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. हे आकडे पाहिल्यावर समजेल या लोकांनी कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवला आहे. हिट अँड रन प्रकरणात सर्व श्रीमंतांची मुले होती. श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचे काम या सरकारने केले. आमचा कोणताही कार्यकर्ता किंवा आमदार रात्रभर कुणासाठी पोलीस ठाण्यात बसत नाही. आमचा कोणताही कार्यकर्ता कुणाचे रक्त बदलण्याचा फंदात पडत नाही. ते सत्ताधारी आहेत. त्यांच्या जवळ सर्व श्रीमंत लोकं आहेत त्यांना सोडवण्यात ते व्यस्त असतात अशी टीकाही यावेळी केली.

दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न खासदार डॉ. अमोल कोल्हे

राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये कशाप्रकारे डुबलेले आहे. हे आज प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमधून दिसून येते. दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातलं महायुतीतलं सरकार काम करतंय आणि हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचा आहे. त्या सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे? याचा उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्कीच न्याय देईल. तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असावा याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचेही खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की, पिंक जैकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा राज्यासमोर असलेल्या काळं भविष्य हलवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मनोज जरांगे बरोबर सरकार अनेकदा बोलले. मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलेल. देवेंद्र फडणवीस ओबीसी लोकांशी बोलले आहेतं ,पण कोण कोणाशी काय बोलले हे आम्हाला कळत नाही. कोणी कोणाला काय कमिटमेंट दिली हे माहित नाही. सत्ताधाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही. सरकार हे म्हणते की वाघनखे महाराजांनी वापरली आहेत. पण म्युझियम म्हणते की ते खात्रीलायक सांगता येत नाही. नेमके खरे काय आहे? असा सवालही यावेळी केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *