Breaking News

नितीशकुमार-भाजपाच्या राजवटीत अशीही शिक्षा तेजस्वी यादव कडून व्हिडीओ ट्विट तरूणाच्या गुदद्वारात मिर्ची फूड टाकतानाचा भयावह व्हिडिओ

बिहारमधील अररियामध्ये एका व्यक्तीला दोरीने बांधून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पावडर भरण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ, आता व्हायरल होत असून, त्या व्यक्तीचे हात पाठीमागे बांधलेले दिसत आहेत. त्याची अर्धी चड्डी काढलेली आहे आणि गुडघ्यापर्यंत खाली ओढण्यात आली आहे, तर अन्य एका साथीदाने संबधित तरूणाचे हात पकडून खाली वाकवल्याचे दिसून आले.

व्हिडिओमधील माणसाला पुरुषांच्या एका गटाने पकडले होते, ज्यांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला होता. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोहम्मद सिफत नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

एक आरोपी त्याच्या गुद्दवारात मिरची पावडर ओतताना आणि पेन्सिल वापरून गुदाशयात भरताना दिसत आहे.

यानंतर, आरोपी त्या व्यक्तीची पॅन्ट ओढून आणि बटणे लावताना दिसत आहे. पुरुषांच्या गटाने मग त्या माणसाची कसून चौकशी केली.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक पुरुषांनी रेकॉर्ड केलेला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या घटनेवरून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर सडकून टीका करत जातीयवाद्यांना आमचे सरकार असले की जंगलराज म्हणून आमच्यावर टीका करतात. मात्र या पध्दतीच्या कृतीवर काहीच बोलत नाहीत. खरे तर अशा पध्दतीची कृती ही तालीबान राज मधील असल्याची टीकाही एक्सवर ट्विट केली.

“मी आणि माझा पक्ष दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या हक्क आणि वाटा याबद्दल बोलतो, त्यामुळे जातीवादी नेहमीच आमच्या राजवटीला जंगलराज म्हणून पाहतात,” तेजस्वी यादव यांनी ट्विट केले.

सदरची घटना ही अररियाच्या इस्लामनगरमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (हत्येचा प्रयत्न) आणि कलम ११७(४) (५ किंवा अधिक व्यक्तींच्या गटामुळे गंभीर दुखापत) नुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर या घटनेत सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

 

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *