Breaking News

आता तालुकास्तरीय नमो रोजगार मेळावे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आढावा बैठकीचे आयोजन

तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १८ जून रोजी मंत्रालयात आढावा घेतला. कौशल्य विकास विभागाची येत्या ३ महिन्यांची रूपरेषा ठरलेली असून, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात येणार आहेत.
तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घेण्यात येणाऱ्या मेळाव्याचे नियोजन, महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठीची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन इत्यादी गोष्टींबाबत महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनीचे नियोजन आणि सद्यस्थितीत सुरु असलेल्या बॅचेस तसेच भविष्यातील प्रवेश प्रक्रियेचे नियोजन याबाबतचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या अकादमीमध्ये सध्या जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरु आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात सुरु झालेल्या स्वच्छ भारत अकॅडमीच्या माध्यमातून विविध विषयात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याठिकाणी मिळणारे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खात्रीशीर नोकरी आणि १८ ते ३५ हजार इतके वेतन मिळेल. येथील पहिल्या बॅचेस पूर्ण झाल्या असून, आता भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. सदर अकॅडमी पाच महसुली विभागात कार्यान्वित करण्याबाबत देखील मंत्री लोढा यांनी निर्देश दिले आहेत.

येत्या ३ महिन्यात १ हजार महाविद्यालयांमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, जेणेकरून शिक्षणासह कौशल्य विकासाला सुद्धा प्राधान्य दिले जाईल. तसेच ग्रामीण भागात कौशल्य विकासासाठी ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या जोडीला आता १००० ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये नव्या केंद्रांची स्थापना होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाकडून राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी कॅबिनेट मंत्री लोढा स्वतः लक्ष घालत आहेत.

या कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबत कठोर निकष असल्याने त्याबाबत काही महत्वाच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या आहेत.

तसेच ऑगस्ट महिन्यात भारतातील सर्वात मोठा स्टार्टअप कन्व्हेन्शन मुंबईमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना आमंत्रित करण्यात येणार आहे. याबाबत असलेल्या तयारीची देखील मंत्री लोढा यांनी माहिती घेतली. २ जुलै रोजी कौशल्य दिंडीचे आयोजन करणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, सुकाणू समिती स्थापनेबाबतची सद्यःस्थिती याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा घेतला. या व्यतिरकीत कौशल्य रोजगार विभागांतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संस्थांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशा सूचना मंत्री लोढा यांनी दिल्या आहेत. या कार्यक्रमात सर्व ITI मिळून सुमारे २ लाख विद्यार्थी योग दिवसात सहभागी होतील.

Check Also

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता

“माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे-जे करता येईल ते करेन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *