चंद्रकांत पाटील यांच्या मोदी बाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसने दिला “गीता” मधील संदर्भ नरेंद्र मोदी फक्त दोन तास झोपतात आता झोप येवू नये म्हणून प्रयत्न करतायत

मागील काही महिन्यापासून महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. त्यातच आता भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणाला तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोन तास झोपत असल्याचे सांगत आता ते झोप येवूच नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी घेत थेट भगद्वगीतेचा संदर्भ देत टोला लगावला.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणाले की, जो व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही तो योगी बनण्याची शक्यता धुसर आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. सचिन सावंत यांनी भगवद्गितेचा संदर्भ दिलाय. “चंद्रकांत पाटीलजी ढोंगी भाजपाने आधी भगवद्गीता वाचावी. अध्याय ६-१६ नात्यश्र्नतस्तु योगोSस्ति न चैकान्तमनश्र्नतः | न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन || म्हणजेच हे अर्जुन! जो अधिक खाता है या बहुत कम खाता है, जो अधिक सोता है या जो पर्याप्त नहीं सोता उसके योगी बननेकी कोई सम्भावना नहीं है,” हा अध्यायच त्यांनी ट्विटरद्वारे उद्घृत केला.

चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते २४ तासदेखील झोपणार नाहीत असे सांगत मोदींवर स्तुतीसुमने उधळली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *