राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही असे मत एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यानंतर त्याचे राजकिय पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात उमटले. विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी राज्य सराकरने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी काही ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही. मात्र मराठी ही राजभाषा आहे. मुंबईत येणाऱ्यांनी मराठी भाषेचा आदर केला आणि वापर केला पाहिजे. परंतु मुंबईत इतर भाषांचा अनादार केला जाणार नाही. जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तो इतरांच्या भाषेचा अनादर करणार नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे. मराठी भाषा ही इथली राजभाषा आहे. येथील सर्व कामकाज व्यवहार हे मराठी भाषेतच चालले पाहिजेत. मराठी भाषेबाबत राज्य सरकारचे स्पष्ट धोरण आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी भाषेबाबत राज्य सरकारचे जे धोरण आहे तेच धोरण राबविण्यात येत आहे असेही यावेळी सांगितले.
त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी उभे राहिले. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदित्य ठाकरे यांना बोलण्याची संधी दिली नाही. मात्र भैय्याजी जोशी यांचा विषय उपस्थित केल्यावरून मंत्री नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. मात्र त्यांचे कोणतेही वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी कामकाजात येऊ दिले नाही. तसेच सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी स्थगित केले.
मुंबईची, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा 'मराठी'च!
इतर भाषांचा सन्मान आहेच परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या ..(विधानसभा, मुंबई | दि. 6 मार्च 2025)#Maharashtra #MahaBudgetSession2025 #MarathiLanguage pic.twitter.com/b0WxkAtVp8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 6, 2025
Marathi e-Batmya