मराठी ई-बातम्या टीम इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याकामी पुढाकार घ्यावा यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असून मागास वर्ग आयोगाला आवश्यक असणाऱ्या सर्व त्या सोयी-सुविधा पुरवा व तात्काळ डेटा गोळा करून ओबींसीचे आरक्षण टिकावे …
Read More »शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना ही भाजपाच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक छत्रपती शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न:- सचिन सावंत
मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक आहे. भाजपाच्या या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचा …
Read More »आघाडी सरकारने अजूनही टाळाटाळ केली तर भाजपाचे आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे टाळल्यामुळे ओबीसी समाजाचे आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारकडे कोणतीही सबब उरलेली नसून या सरकारने डेटा गोळा करण्यात अजूनही टाळाटाळ केली तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल, असा …
Read More »भुजबळ म्हणाले, डेटा गोळा करावा लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम भारत सरकारच्यावतीने हे सांगण्यात आले की हा डाटा आम्ही ओबीसीसाठी गोळाच केला नाही. हा केवळ सामाजिक, आर्थिक डाटा आहे, तो ओबीसीठी नाहीच. अशाप्रकारचं विधान त्यांनी केले. त्यावर आमच्या वकीलांनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला. खासदार विल्सन यांनी देखील पटवून देण्याचा प्रयत्न केला, की आम्ही समता परिषदेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात …
Read More »ओमिक्रॉनच्या संकटकाळात नेतृत्वाच्या अभावामुळे सरकार भरकटले भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातच त्याचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात असल्याने या फैलावापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने जनतेस दिली पाहिजे अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी …
Read More »फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने आतातरी शहाणे व्हावे! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सल्ला
मराठी ई-बातम्या टीम केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात जिल्हा परिषदा आणि नगर परिषदा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत आणि तसा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मनाला अतिशय वेदना होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने आतातरी शहाणे व्हावे असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, आधी ओबीसींच्या २७ टक्के जागा निश्चित करा नंतरच निवडणूक प्रक्रिया सुरु करा-राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला निर्देश
मराठी ई-बातम्या टीम राज्यात ओबीसींच्या जागा निश्चित करताना राज्य सरकारने स्वतंत्र पध्दतीने निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली नाही. मात्र केंद्र सरकारच्या ओबीसी विधेयक आहे तसे स्विकारून राज्यात २७ टक्के आऱक्षण लागू केलेले आहे. त्यामुळे आधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या २७ टक्के जागा आधी निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी …
Read More »सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दीपक दळवींवरील हल्ल्याचा निषेध: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा भागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले …
Read More »परमबीर सिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? एक दिवस एनआयएला खरं काय आहे ते सांगावं लागेल - नवाब मलिक यांचा आरोप
मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार व भाजपासोबत परमबीर सिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते, त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार …
Read More »नागपूरात काँग्रेसला तर अकोल्यात शिवसेनेला धक्का सहापैकी चार ठिकाणी भाजपा तर फक्त दोन ठिकाणी मविआचे उमेदवार विजयी
मराठी ई-बातम्या टीम विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पाठविण्यात येणाऱ्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सहापैकी चार जागांवर भाजपाने यश मिळवित महाविकास आघाडीवर कुरघोडी केली आहे. तर फक्त दोन ठिकाणी महाविकास आघाडीला विजय मिळविता आला आहे. विशेष म्हणजे नागपूरात महाविकास आघाडीचे मते फुटून ती भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाल्याने त्यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya