२००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एनआयए आणि इतर तपास यंत्रणांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. “जर या प्रकरणात कोणताही दोषी नसेल, तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?” असा थेट सवाल केला. ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्रीय मंत्री पाटील यांना पत्र, अलमट्टीबाबत आदेश द्या पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आऱ. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती
कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे …
Read More »केशव उपाध्ये यांची टीका, काँग्रेसच्या ‘हिंदू दहशतवादा’ च्या फेक नॅरेटिव्ह’ला एनआयएची चपराक मालेगाव बॉम्बस्फोट निर्णयाचे भाजपाकडून स्वागत
‘भगवा आतंकवाद’ आणि ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा फेक नॅरेटिव्ह तयार करून हिंदू समाजाबद्दल विष पेरण्याच्या प्रयत्नास एनआयए न्यायालयाने दिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाने काँग्रेसला सणसणीत चपराक बसली आहे. या खटल्यात सात हिंदू राष्ट्रवाद्यांना आरोपी ठरवून अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याचा काँग्रेसचा कट उधळला गेला असून, हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही ही …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार का? दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना शिक्षा कठोर झालीच पाहिजे
काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीव गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव …
Read More »-मुख्यमंत्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा
राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप, मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची टाळाटाळ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई …
Read More »मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीत वाढ
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, …
Read More »जयकुमार गोरे यांचे आदेश, ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश
ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेतील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, कायमस्वरूपी सिंचन प्रकल्प पूर्ण करा जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी १८ वर्षानंतर निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी उमेद मॉल, महिलांसाठी न्यायालय यासह काही महत्वाचे निर्णय
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत उमेद मॉल, महिलासांठी न्यायालय, पिंपरी-चिंचवडसाठी न्यायालयासह, शेतकऱ्यांसाठी बाजारतळ, बोर आणि धाम येथील सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र गोवा येथील वकीलांसाठी ठाण्यातील जमिन देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य …
Read More »
Marathi e-Batmya