राजकारण

पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या काम करणाऱ्यांनाच संघटनेत मिळणार पदे, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात  काम करणा-या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून …

Read More »

जयकुमार रावल यांची माहिती, परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात खरेदीची परवानगी

बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार  राज्यात निदर्शनास येत आहेत.  त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईल, असे पणन …

Read More »

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील  सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व  विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा, गृहनिर्माण, आरोग्य, मानसिक आरोग्य व इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंमलीपदार्थ तस्करी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई कायद्यात बदल करणार असल्याचे दिले आश्वासन

‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील …

Read More »

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसाकडे केली आमदार सुनिल शेळके यांची तक्रार रॉयल्टी बुडवल्याचा केला आरोप, पत्र पाठवत केली मोठा आरोप

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवित अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात तक्रार केली. या पत्रात संजय राऊत यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात गंभीर आरोप करत शेळके यांच्याकडून महाराष्ट्राची होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे …

Read More »

नाल्याच्या प्रश्नावरून…सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, दादा कोंडके सारखे…. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना एसंशिचे मंत्री संजय राठोड यांच्या उत्तरावरून नापसंती

पावसाळी अधिवेशनाच्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संख्येने कमी असले तरी विरोधकांकडून राज्यातील जनतेच्या प्रश्नांवरून रण उठविले जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र संख्याबळाच्या संख्येत लहान असलेल्या विरोधकांमध्ये अनेक प्रश्नांवरून एकमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकाबाजूला विरोधकांकडून दररोज विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावरून सरकारचे लक्ष …

Read More »

शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूमापनाला शेतकऱ्यांचा विरोध शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी (१ जुलै २०२५) रस्त्यावर निदर्शने केली आणि प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूमापनाला विरोध केला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला गोव्याशी जोडणाऱ्या ८०२ किलोमीटरच्या ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित, सहा-लेन कॉरिडॉरसाठी त्यांच्या सुपीक जमिनीच्या अधिग्रहणाबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २४ जून रोजी या प्रकल्पासाठी …

Read More »

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांनी पदभार स्विकारला, पहिल्यांदाच निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे

भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात रविंद्र चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, बीडमधील लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची तात्काळ कारवाई

बीड येथील कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल,  अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. …

Read More »

भिवंडीला आशिया खंडातील लॉजिस्टिक हब साठी समिती गठीत करणार त्यात भिवंडी पूर्व चे आमदार रईस शेख यांचा समावेश

भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष …

Read More »