Breaking News

स्व.गोपीनाथ मुंडेचा राजकिय वारस कोण? पंकजा कि धनंजय, आगामी निवडणूकीत ठरणार

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात लाडकं घराणं असलेल्या मुंडे राजकिय घरणाऱ्याचा अर्थात स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर नाराजी वाढत आहे. त्यामुळे स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकिय वारसदार कोण? पंकजा कि धनंजय, असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात असून आगामी विधानसभा निवडणूकीत याचे उत्तर मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

स्व.गोपीनाथ मुंडे यांना माननारा एक वर्ग राज्यातील बीड जिल्ह्याबरोबरच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातही आहे. त्यातच राज्यातील ओबीसी चळवळीचे नेते म्हणूनही त्यांच्याकडे छगन भुजबळ यांच्यानंतर पाहिले जात होते. मात्र त्यांच्या निधानानंतर त्यांची कन्या तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे समस्त मुंडे समर्थकांनी पाठिंबा दिला. तसेच त्यांना विधानसभेवर निवडूणही पाठविले. परंतु पंकजा मुंडे या मंत्री झाल्यापासून त्या कार्यकर्त्यांना भेटत नसल्याच्या आणि कामे करत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच परळीतील आपल्या मतदारसंघाऐवजी त्या मुंबईतच जास्त रहात असल्याची चर्चा परळीकरांमध्ये आहे.

तर दुसऱ्याबाजूला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे तथा पंकजाचे चुलत भाऊ धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. धनंजय मुंडे हे मुंबईबरोबर बीड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर वेळ देत आहेत. तसेच स्थानिक नागरीकांना भेटण्याकडेही त्यांचा मोठा कल असून बीड जिल्ह्यातला कोणताही कार्यकर्ता मुंबईत येवो अथवा परळीतल्या घरी येवो त्याच्यासाठी वेळ देत आहेत. कधी कधी तर कार्यकर्त्यांच्या कामासाठी स्वत:च पाठपुरावाही घेतात. कदाचीत पंकजा या स्त्री असल्याने त्यांना मर्यादा येत आहेत, तर धनंजय हे पुरूष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे धनंजय आणि पंकजा यांच्यामध्ये सध्या स्थानिक परळीकरांकडून तुलना सुरु असून स्व.गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकिय वारसदार धनंजयच असल्याची चर्चा सुरु आहे.

मात्र एकंदरीतच राज्यातील राजकिय परिस्थिती पाहता आगामी विधानसभा-लोकसभा निवडणूकीत परळीसह मराठवाडा आणि इतर भागातील मुंडे समर्थक कोणाच्या पाठीशी उभे राहणार यावरच पंकजा कि धनंजय खरे वारसदार ठरणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत