Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, NEET घोटाळा हा केंद्रपुरस्कृत NEET-UG पेपर फुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर साधला निशाणा

मागील काही दिवसांपासून NEET-UG परिक्षेतील पेपर फुटीप्रकरणी आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कवरून संपूर्ण देशभरातच केंद्र सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आहे. तसेच NEET-UG परिक्षा प्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीचे पडसात सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनातही उमटत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर त्यांच्या एक्स या ट्विटवरून टीकास्त्र सोडले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या या मोठ्या योजनेत मोहरे ठरलेल्या शिक्षकांना अटक करणे म्हणजे खऱ्या गुन्हेगारांपासून आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. हा एक तमाशा आहे, NEET घोटाळा हा केंद्रपुरस्कृत असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अटक करण्यात आलेले ‘दलाल’ स्वबळावर देशव्यापी घोटाळा करू शकले नसते. व्यापम घोटाळ्याप्रमाणेच या संघटित गुन्हेगारीचा मुख्य सूत्रधार सरकारच असल्याची टीकाही यावेळी केली.

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *