आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, माझ्याकडची माहिती तुम्हाला देतो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
भीमा कोरेगांव प्रकरणाची काही महत्वाची माहिती माझ्याकडे असून ती पुढील भेटीत आपणास देणार असल्याचे सांगत एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी २६ तारखेला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात परवा मोर्चा काढण्यात येणार आहे. तो मोर्चा शांततेत व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यानी आवाहन केले होते. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी आपणास भेटीसाठी बोलाविले होते. त्या अनुंषगाने आपण भेटीसाठी आल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत एनआरसी कायद्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यात राज्यातील 16 टक्के समाजाकडे कोणत्याही नोंदी नाहीत. त्यामुळे त्यांच्या नागरीकत्वाचा प्रश्न निर्माण होत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
एनआरसी (NRC) मुळे मुस्लिम समाजच नाही तर हिंदू समाजावर ही अन्याय होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *