बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे. महाबोधी महाविहार कायदा, १९४९ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हणाले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१२) राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, बौद्ध समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आणि या आंदोलनात बौद्ध समाज आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
𝐑𝐞𝐩𝐞𝐚𝐥 𝐓𝐡𝐞 𝐁𝐨𝐝𝐡 𝐆𝐚𝐲𝐚 𝐓𝐞𝐦𝐩𝐥𝐞 𝐀𝐜𝐭, 𝟏𝟗𝟒𝟗!
बोधगया टेम्पल एक्ट 1949 को निरस्त करने और गया में महाबोधि महाविहार का नियंत्रण बौद्धों को सौंपने की मांग को लेकर वंचित बहुजन आघाड़ी बुधवार, 12 मार्च, 2025 को पूरे महाराष्ट्र में विरोध प्रदर्शन आयोजित करेगी।… pic.twitter.com/j6uv1mbtyx
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 9, 2025
Marathi e-Batmya