अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. त्यानंतर या पदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले. तसेच अमेरिकेने घोषणा केल्यानंतर भारतावर आकारण्यात येणाऱ्या टेरिफचा मुद्दा ही त्यावेळी चर्चेत होता. या अमेरिका दौऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत म्हणाले की, मोदींना अमेरिका दौऱ्यात काय मिळाले, हद्दपारी शुल्क असा खोचक टोला एक्सवर ट्विट करत लगावला.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी डोनाल्ड वाक्यही या ट्विट मध्ये उद्ग्रुत करत “आपण काय करणार आहोत ते येथे आहे: परस्पर. तुम्ही जे काही आकारता ते मी आकारतो. — अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींना सांगितल्याचे स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला नेमके काय मिळवले?! हद्दपारी! शुल्क! परस्पर शुल्क आपल्या देशाच्या अपेक्षांच्या विरुद्ध आहे. मोदींच्या अमेरिका भेटीपूर्वी, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी व्यापार करार वाटाघाटी दरम्यान सवलती मिळवण्याची आशा केली होती. परंतु मोदींच्या अपयशी नेतृत्वामुळे आम्हाला परस्पर शुल्क मिळाले असल्याची आठवणही यावेळी करून दिली.
“Here’s what we’re going to do: reciprocal. Whatever you charge, I’m charging. — US President Donald Trump to Modi.
What exactly did Modi obtain for India from his US tour?! Deportations! Tariffs!
The reciprocal tariff is in contrast to the expectations of our country. Ahead… https://t.co/IdNLtjxGib
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 20, 2025
शेवटी या दौऱ्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जागतिक व्यापारात अमेरिकेला अन्याय्य वागणूक मिळत असल्याचे कारण देत डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीची वकिली केली होती. जर मोदींना जागतिक व्यापार आणि अर्थशास्त्राचे थोडेसे ज्ञान असते, तर ते ट्रम्प यांना समजावून सांगू शकले असते की जगासोबत मोठ्या प्रमाणात व्यापार असमतोल असल्याने अमेरिकेला फायदा होतो, कारण बहुतेक व्यापारात अमेरिकन डॉलर – जागतिक राखीव चलन – वापरले जाते, जे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ देते आणि कदाचित व्यापार वाटाघाटींमध्ये भारताला सवलती मिळवून दिल्या असते ! असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya