वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर काँग्रेसला १४४ जागा देण्याची अँड. प्रकाश आंबेडकरांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चार बड्या पक्षांकडून आघाडी-युतीची आणि जागा वाटपाची अद्याप चर्चाच सुरु आहे. मात्र तत्पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचा राजीनामा जाहीर करत पोलिसांची आठ तासाची ड्युटी करणार तर होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता देणार असल्याचे आश्वासन अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
बँलार्ड पिअर येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात वंचित बहुजन आघाडी सरकारचे सरकार आल्यानंतर पोलिसांची दिवसाची डयुटी आठ तासाची करणार आणि भत्ता कामगार असलेल्या होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत सरकारमध्ये कामगार मंत्री असतांना त्यांनी पोलिसांना केवळ आठ तासाची सेवा असली पाहिजे असा आटोकाट प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्याना अपेक्षित असलेली आठ तासाची सेवा अनेक सरकारे लागू करू शकले नसल्याची खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या निर्णयामुळे लाखो पोलिसांची दिवसांना फक्त आठ तास ड्युटी केल्यामुळे पोलीस दल तणाव मुक्त, भीती मुक्त होवून योग्य प्रकारे सेवा व सुरक्षा देतील.
तसेच त्यांच्या सोबतीने सुमारे 36000 होमगार्डस देखील कार्यरत आहेत. या होमगार्डसना दरमहा फक्त 2500 ते 3000 रुपये इतकेच मानधन राज्य शासनाकडून दिले जाते. एवढ्या कमी पैशात होमगार्डचे कुटुंब जीवन जगणे अशक्य असल्याचे सांगत राज्यातील सर्व होमगार्डसना भत्ता कामगार ऐवजी पगारी सरकारी कामगार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सरकार मान्यता देईल. तसा पगार देखील होमगार्डसना दिला जाईल. समस्त जनता व होमगार्डस कर्मचारी त्यांचेही जगणे वंचित बहुजन आघाडी सरकार सुखी करेल असेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने चर्चा सुरु असून आघाडीला १४४ जागा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

टीईटी परिक्षे दरम्यान महिलांना मंगळसूत्र-दागिने काढायला लावले, अंबादास दानवे यांचा संताप संभाजी नगरमधील घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

राज्यात टीईटी परिक्षा होत आहे. परिक्षेसाठी परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर जमा झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *