प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, बिहार निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए)च्या विरोधात मतदान करा रशियाच्या तेलाचा फायदा सरकारला नाही, तर अंबानीच्या खासगी कंपनीला

आरएसएस-भाजपाला देशाचे संविधान बदलयाचे आहे. देशाला वाचवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि पेरियार स्वामी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए) युतीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पटना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए) युतीविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही तुम्हाला कोणाला मतदान करायचे हे सांगणार नाही, परंतु तुम्ही एनडीए युतीच्या विरोधात मतदान करून देश वाचवला पाहिजे, असे आवाहनही यावेळी केले.

रशियाकडून भारताने खरेदी केलेल्या स्वस्त कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. भारताने रशियाकडून जे स्वस्त कच्चे तेल खरेदी केले, त्याचा फायदा भारत सरकारला न होता, उलट भारतातील खासगी कंपन्या रिलायन्स ऑईल आणि नायरा कंपनीला होत असल्याचा थेट आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जग म्हणत आहे की, ही आर्थिक व्यवस्था (इकॉनॉमिक सिस्टीम) योग्य नाही. जर याचा फायदा भारत सरकारला झाला असता आणि देशातील डिझेल, पेट्रोलचे दर कमी झाले असते, तर हे धोरण लोकांसाठी आहे, असे मानले गेले असते, असेही यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भारत सरकारचे हे धोरण खासगी कंपन्यांसाठी आहे. जर उद्या या खासगी कंपन्या इतर देशांतील कंपन्यांसोबत बाजारपेठेत उतरल्या, तर याचा फटका त्या देशाला बसेल. यामुळेच त्यांनी भारतावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा मिळाला नाही ऑपरेशन सिंदूरनंतर कोणताही मोठा देश आमच्यासोबत उभा राहिला नाही. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, तुर्की, चीन आणि रशियासुद्धा पाकिस्तानसोबत उभे राहिले असल्याचा उल्लेख केला.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपावर संविधानाच्या बदलाच्या संदर्भात गंभीर आरोप करत म्हणाले की, आरएसएस-भाजपाला देशाचे संविधान बदलायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, पेरियार स्वामी यांना मानणारे जे लोक आहेत, त्यांना आमचे आवाहन आहे की, जर देशाला वाचवायचे असेल, तर या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए) युतीविरोधात आपले मत द्या, अशी मागणीही यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर शेवटी बोलताना म्हणाले की, कोणत्या पक्षाला मत द्यायचे हे सांगितले नाही, पण “कोणाला मत द्यायचे, हे आम्ही सांगणार नाही, पण एनडीए युतीविरोधात आपले मत देऊन देशाला वाचवायचे असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *